अवैध दारू- मद्यार्काची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना २० टक्के बक्षिस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विभागाला निर्देश

मुंबईः प्रतिनिधी
अवैध मद्य आणि मद्यार्क वाहतुकीला आळा आणि त्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यासाठी त्यांच्या बक्षिस रकमेत ५ टक्क्यांवरुन २० टक्क्यांपर्यंत वाढ करावी असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन इमारती बांधताना यापुढे ‘ग्रीन बिल्डींग संकल्पनेचा आधार घेण्याच्याही सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशीर्ष चक्रवर्ती, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, आयुक्त कांतिलाल उमाप आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील अवैध मद्य आणि मद्यार्क वाहतूकीमुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपासणी चौक्यांची संख्या वाढवण्यात यावी. नाक्यांवर कडक तपासणी करावी. विषारी ताडीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी गांभिर्याने विचार करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये शासकीय जागेत बांधताना ‘ग्रीड बिल्डींग’ संकल्पनेच्या बरोबरीने सौरऊर्जा यंत्रणा, इमारतीची स्वच्छता आदी बाबींना प्राधान्य द्यावे. राज्यातील भाड्याच्या इमारतीत असणाऱ्या कार्यालयांच्या खर्चाचा जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम (SIR) निष्पक्षपणे राबवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अनेक राज्यातून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *