पटोलेंचा आरोप, नरेंद्र मोदी हे महापुरुषांपेक्षा मोठे असल्याचे दाखविण्याचा भाजपा प्रयत्न महाराष्ट्र आणि महापुरुषांचा अवमान भाजपा करतेय

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे दैवत आहेत. आमच्या या दैवतांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत असतात. कर्नाटकातील भाजपा सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला फेटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातला. त्यावरून काँग्रेसने टीका केली.

भाजपाची ही विकृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारी नाही. आजही पुण्यातील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या पगडीवर छत्रपत्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावण्यात आली होती. काँग्रेसने त्याला आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. नरेंद्र मोदी हे आमच्या महापुरुषांपेक्षा मोठे आहेत हे भाजपा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोदी हे शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांपेक्षा मोठे नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेने ठणकावून सांगितले आहे तरीही जाणीवपूर्वक भाजपाकडून त्याची पुनरावृत्ती केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही भाजपाकडून अडवणूकीची भूमिका घेतली गेली आहे. आरक्षण संपवायचे हा त्यांचा डाव आहे. म्हणूनच ९८ टक्के अचुक असलेल्या डेटा केंद्र सरकार राज्य सरकारला देत नाही. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा एकट्या महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेशातही आहे, तेथे भाजपाचे सरकार आहे मग तिथे भाजपामुळेच आरक्षण गेले असे भाजपावाल्यांचे म्हणणे आहे का ? परंतु मंडल आयोगाला विरोध करत कमंडल कोणी आणले हे जगाला माहित आहे. भाजपा मंडल आयोगाच्या शिफारशीच संपवायला निघाले आहे. पण हा डाव आम्ही हाणून पाडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हाच तो फेटा जो मोदींना घालण्यात आला.:-

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *