एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमीः सरसकट ५ हजाराची दिवाळी भेट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी – कर्मचारी वर्गाला होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही चन्ने यांनी सांगितले.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची माहिती, राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा

राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *