Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांनी टोचले मोदी यांचे कान, बेटी बचाव नव्हे तर… महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून मोदींना निशाणा

महिलांना संरक्षणाची नाही तर, त्यांना भयमुक्त वातावरण हवे आहे. आपल्या महिलांवर होणारा कोणताही अन्याय असह्य, वेदनादायी आणि अत्यंत निषेधार्ह आहे. आम्हाला ‘बेटी वाचवा’ ची गरज नाही तर ‘बेटीला समान हक्क मिळवून देण्याची’ गरज असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

संपूर्ण देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी एक्सवर ट्विट करत भूमिका मांडत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, देशात दर तासाला ४३ महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद होते. आपल्या देशातील सर्वात असुरक्षित दलित-आदिवासी समाजातील महिला आणि मुलांवर दररोज २२ गुन्हे नोंदवले जातात. भीती, सामाजिक कारणांमुळे असे असंख्य गुन्हे आहेत जे नोंदवले जात नाहीत अशी माहितीही यावेळी दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेवर टीका करताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदीजींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात महिलांच्या सुरक्षेबद्दल अनेकदा बोलले, पण त्यांच्या सरकारने महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी गेल्या १० वर्षांत काहीही ठोस केले नाही. उलट त्यांच्या पक्षानेही पीडितेच्या चारित्र्याची वारंवार हत्या केली आहे, जी लज्जास्पद आहे असल्याची खोचक टीकाही यावेळी केली.

मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक भिंतीवर “बेटी बचाओ” हे चित्र काढल्याने सामाजिक बदल घडतील की सरकार आणि कायदा व सुव्यवस्था सक्षम होईल? असा सवाल उपस्थित करत आम्ही प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सक्षम आहोत का? आपली फौजदारी न्याय व्यवस्था सुधारली आहे का? समाजातील शोषित आणि वंचित घटक आता सुरक्षित वातावरणात जगू शकणार आहेत का सरकार आणि प्रशासनाने घटना लपविण्याचा प्रयत्न केला नाही का? सत्य बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांनी बळजबरीने मृतांचे अंतिम संस्कार करणे बंद केले आहे का? अशा प्रश्नांची सरबतीही यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे बोलताना म्हणाले की, आपण विचार केला पाहिजे की २०१२ मध्ये जेव्हा दिल्लीत “निर्भया” ची घटना घडली तेव्हा न्यायमूर्ती वर्मा समितीच्या शिफारशी लागू केल्या गेल्या, आज आपण त्या शिफारसी पूर्णपणे लागू करू शकलो आहोत का? असा सवाल करत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायद्यातील तरतुदी २०१३ मध्ये संमत केलेल्या तरतुदींचे योग्य प्रकारे पालन केले का जेणेकरून कामाच्या ठिकाणी आपल्या महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करता येईल? असा सवालही यावेळी केला.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, राज्यघटनेने महिलांना समान दर्जा दिला आहे. महिलांवरील गुन्हे ही गंभीर समस्या आहे. हे गुन्हे थांबवणे हे देशापुढील मोठे आव्हान आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन यावर उपाय शोधला पाहिजे असे आवाहनही यावेळी केले.

शेवटी मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, जेंडर सेन्सिटायझेशन अभ्यासक्रम असो की जेंडर बजेटिंग, महिला कॉल सेंटर्स असो किंवा आपल्या शहरातील स्ट्रीट लाइट्स आणि महिला स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा असोत किंवा पोलीस सुधारणा असोत किंवा न्यायालयीन सुधारणा असो – आता वेळ आली आहे की आपण महिलांच्या हक्कांची खात्री करण्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे असे मतही यावेळी व्यक्त केले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *