आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा विश्वास, आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण होणार अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन केल्याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन

राज्यात ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील १ कोटी ३५ लाख आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करीत आहोत, असे राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचलून या आयोगासाठी वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद ही केल्याबद्दल अशोक उईके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक उईके बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टी जनजाती मोर्चाचे प्रदेश सचिव प्रवीण धोडिया, जनजाती मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष ज्योती धोडी, निलम वरठे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. या आयोगामुळे आदिवासी समाजाच्या संविधानिक हक्कांचे रक्षण होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मंत्री अशोक उईके पुढे बोलताना म्हणाले की, या आयोगाचा मोठा लाभ आदिवासी समाजाला होणार आहे. एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य या आयोगात कार्यरत रहाणार असून त्यासाठी येणा-या खर्चास मान्यता देखील देण्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा आयोग काम करणार आहे. आदिवासी समाजाच्या प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि स्थानांतराविषयीच्या सर्व समस्या शासनापुढे मांडण्याचे मोलाचे काम आयोग करेल असेही नमूद केले.

पुढे बोलताना अशोक उईके म्हणाले की, शासन, आदिवासी समाज आणि प्रशासन यातील महत्वाचा दुवा म्हणून ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ येणा-या काळात काम करेल असा विश्वासही बोलून दाखवला.

About Editor

Check Also

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण • सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक• हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *