मंत्र्यांची दिशाभूल करणाऱ्या सहसचिवावर कारवाई मंत्री रवींद्र चव्हाण यांचा जोरदार झटका

मंत्री आणि मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी विभागाच्या सहसचिवाला जोरदार झटका दिला आहे. एका अधिका-याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत त्या अधिका-याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच मंत्री कार्यालयाची जाणीवपूर्वक दिशाभूल करणा-या या अधिका-याची तातडीने चौकशी करुन दोषी विरुध्द कारवाई करण्याचे आदेशही रवींद्र चव्हाण यांनी आज अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार विभागात खपवून घेतले जाणार नाही, अशी यापूर्वीच ताकिद दिली होती. विभागाचा कारभार हा पूर्णपणे स्वच्छ आणि पारदर्शक असला पाहिजे असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सदर गंभीर प्रकार निर्दशनास आल्यानंतर चव्हाण यांनी प्रतिनियुक्तीने विभागात कार्यरत असणारे सहसचिव सुधीर तुंगार यांची रवानगी तात्काळ मूळ विभागात करण्याचे आदेश दिले आहेत.
तुंगार यांनी हेतुपुरस्सरपणे केलेली कृती ही शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी असल्याची आहे. त्यामुळे या प्रकरणी तुंगार हे प्रथम दर्शनी जबाबदार असल्याचे निर्दशनास आले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे लेखी आदेश चव्हाण यांनी विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या धान उत्पादक जिल्ह्यातील धानापासून तयार झालेल्या सि.एम.आर (तांदूळ) इतर जिल्ह्यांना उचल व वाटप करण्यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्यास शासनाची मान्यता घेण्याचा २०२० मधील शासन निर्णय आहे. परंतु या प्रकरणामध्ये विभागाने या विषयाबाबतच्या फाईलवर मंत्री चव्हाण यांची मान्यता न घेता यासंदर्भातील निर्णय परस्पर घेतला. एवढेच नव्हे तर २० सप्टेंबर २०२२ च्या पत्रान्वये उचल व वाटप करण्यासंदर्भात सूचना दिल्या. विशेष म्हणजे हा निर्णय घेतल्यानंतर सदर फाईल केवळ सोपस्कर म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या अवलोकनार्थ म्हणून सादर केली. मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन आणि त्यांना अंधारात ठेऊन तुंगार यांनी कृती केल्याचे उघड झाले. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *