Breaking News

मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनातलं बोलले….. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांचे वक्तव्य

कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांनी करत अप्रत्यक्ष महायुती सरकारमध्येही सार काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले.

मंत्री तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, अजित पवार सारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित पवारांच्या मनात असावी हे कधी वाटलं नव्हतं. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध अजित पवारांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे असा टोलाही यावेळी लगावला.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची झालेली पीछेहाट याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार आहेत असा सूर आरएसएस व भाजपाने खुलेआम उपस्थित करून अजित पवारांना जबाबदार ठरविले. त्यातच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांच्याविषयी भूमिका व त्यांना सरकारमध्ये सामील केल्याबाबतची नाराजी ही आता उघड उघड समोर येऊ लागलेली असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले, शरद पवार साहेबांच्या पक्षापासून फारकत घेत अजित पवार यांनी विकासाच्या साठी सत्तेमध्ये जात आहोत अशी घोषणा केली होती त्याला दुजोरा प्रफुल पटेल, छगन भुजबळ,सुनील तटकरे व आदी नेत्यांनी दिला होता. आता अजित पवारांच्या अस्तित्वावरच घाला मंत्री तानाजी सावंत यांनी घातल्यानंतर अजित पवारांच्या पक्षातील हे सर्व नेते गप्प का असा सवालही यावेळी उपस्थित केला.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभेमध्ये महायुतीकडून ८० ते ९० जागा मिळवू अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली होती आता २५ जागा मिळतील की नाही याचीही शाश्वती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राहिली नाही आणि म्हणूनच त्यांना अशा प्रकारचा अपमान सहन करावा लागतो. शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षांमध्ये अजित पवार असताना त्यांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ असायची. त्याच अजित पवारांच्या बाजूला बसून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होतात हे अगदी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलं तानाजी सावंत बोलून गेले की काय असा कुत्सित सवालही यावेळी केला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *