पंतप्रधान नोकरी द्या…. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरूपम यांचे आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी

संसदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बेरोजगारांनी पकोडे तळून रोजगार उपलब्ध करावा असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पकोडे तयार करण्याचे आंदोलन केले. त्यानंतर बेरोजगारांना नोकरी मिळावी यासाठी थेट पंतप्रधानांनाच नोकरी मागण्यासाठी पंतप्रधान नोकरी द्या ची मागणी करत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी मंत्रालयाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन केले.

” पंतप्रधान नोकरी द्या … प्रधानमंत्री हाय हाय च्या घोषणेने हा परिसर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात अतिशय कडक सुरक्षा  व्यवस्था करण्यात आली होती. निरुपम यांनी मंत्रालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता निरूपम यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले.

गेल्या शुक्रवारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंत्रालयासमोर पकोडे अर्थात भज्याचे स्टॉल लावून आंदोलन करण्याची घोषणा आलेली होती .मात्र पोलिसांनी त्यांना गिरगाव जवळ ताब्यात घेतल्याने त्यांचे आंदोलन फसले. मात्र आज पुन्हा मंत्रालयाजवळच्या आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची घोषणा निरुपम यांनी केली होती. या अनुषंगाने पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.

तरीही निरुपम आपल्या कार्यकर्त्यांसह या परिसरात पोहचले आणि त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही. कोट्यवधी तरूणांना रोजगार देण्याची घोषणा त्यांनी केली, मात्र तरुणांना त्यांनी रोजगार दिले नाही. पदवीधर तरुणांना पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रस्त्यावर पकोडे तळण्याचा सल्ला दिला आहे. हा देशातल्या तरुणांचा अपमान असून या विरोधात हे आंदोलन असल्याचे निरुपम यावेळी म्हणाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुतीच्या विजयात बोगस मतदान, फिक्सिंग काँग्रेसचे पाच शहरात महापौर तर ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *