शनिवार वाड्यात नमाज पठण ? भाजपा खासदार मेधा कुलकर्णी पतित पावनच्या कार्यकर्त्यांसोबत गोमूत्र शिंपून जागेचे शुद्धीकरण केले

उभ्या महाराष्ट्राला मनूवादी विचारणीची ओळख आणि त्याची शिल्लक अवशेष असलेल्या पेशव्यांच्या शनिवार वाडा येथे काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पुण्याच्या भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यानी रा. स्व.संघ प्रणित पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना शनिवार वाड्यातील त्या जागेचे गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच असले प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली.

पुणेच्या भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात एक पोस्ट एक्सवर करत म्हणाल्या की, पुण्याचे वैभव शनिवार वाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ, सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार हा पुणेकरांसाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय, पुणे प्रशासन नेमके काय करते असा सवाल करत आहे आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय असा सवाल करत चला आपण सर्वजण एकत्र येऊ आणि शिववंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया अशी पोस्ट लिहून मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळी जाऊन सदर घटनेचा निषेध केला.

पुढे भाजपा खासदार मेधा कुलकर्णी लिहितात, शनिवार वाड्यात जिथे आलो आहोत त्याच ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं. त्या जागेचं शुध्दीकरण आम्ही शिववंदना करून करणार आहोत. हिंदू शक्ती एकवटली आहे. आपण पुढच्या काळातही अशीच आंदोलनं केली पाहिजेत. शनिवार वाडा हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला ते ठिकाण हे आमच्या विजयाचं प्रतिक आहे. मुघलांचा नाश या ठिकाणी झाला. तेच इथं येऊन नमाज पठण करत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे. तुम्ही ज्या नाईलाजस्तव हिंदू धर्म सोडून धर्मांतर केले आहे. तुम्ही हिंदू धर्मात परत या. त्या र्मात राहायचं असेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमात पठण करा. सार्वजनिक ठिकाणी किंवा ऐतिहासिक ठिकाणी येऊन नमाज पठण करू नका. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका. यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही. पतित पावन संघटना या ठिकाणी शुद्धीकरण करून शिववंदना गाणार आहे. तसंच पूर्वी या ठिकाणी माघी गणेशोत्सव साजरा होत होता. तो पुन्हा सुरु करावा अशी मागणी ही यावेळी केली.

भाजपाच्या आमदार आणि खासदारांना झालंय तरी काय ?

राज्यात आणि केंद्रात भाजपाप्रणित आघाडीचे सरकार सत्तास्थानी आल्यापासून भाजपाच्या आमदार आणि खासदारांनी देशभरात कोणत्या ना कोणत्या कारणाने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी कोकणचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्याकडून अनेकदा अशा पद्धतीची वक्तव्य करून कारण नसताना हिंदू विरूद्ध मुस्लिम असा वाद पेटविण्याचा प्रयत्न केला. आत त्यात पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाची भर पडली आहे. निवडून आल्यानंतर किंवा नियुक्त केल्यानंतर प्रत्येक आमदार आणि खासदाराला त्याला पदाची शपथ दिली जाते. त्यावेळी राज्य घटनेद्वारे विधिलिखित अशा गोष्टीला कोणत्याही स्वरूपात त्यांच्या स्वातंत्र्याला बाधा किंवा संरचनेला धक्का बसेल, कोणत्याही एका विशिष्ट समुदायास त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही आणि अशी शपथ दिली जाते. पण प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या आमदार खासदारांना या शपथेचा विसर पडलेला असल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..

राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *