सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे कोरोना पॉझिटीव्ह हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला गेल्यानंतर लागण

मराठी ई-बातम्या टीम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे नुकतेच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना थोडीसे प्रकृत्ती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तपासणी असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच त्यांचे पती सदानंद सुळे यांचीही तपासणी केला असता त्यांनाही या विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल आला असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली.

त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नसल्याचे स्पष्ट करत यावेळी संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची तपासणी करण्याचे आवाहन करत त्यांच्याविषयी काळजी करण्याचे कारण नसल्याची माहितीही त्यांनी ट्विटरवरून दिली.

About Editor

Check Also

महाराष्ट्रात धार्मिक स्वातंत्र्य विधेयक कायदा विधानसभेत सादर प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद ० धार्मिक धर्मांतराच्या ६० दिवस आधी लेखी सूचना आवश्यक

महाराष्ट्रात जबरदस्तीने धर्मांतर आणि तथाकथित “लव्ह जिहाद” रोखण्याच्या उद्देशाने, भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शुक्रवारी विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *