राणा दांम्पत्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, धार्मिक कार्यक्रम करायचा तर घरी करा मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था

मागील दोन दिवासांहून अधिक काळ मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणायचे आहे म्हणून राणा दांम्पत्यांच्या राजकिय कृत्यांवर आणि त्यानंतर मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, तुम्हाला जर धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करू शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली तर दोष देणार नसल्याचे स्पष्ट करत शिवसेनेच्या कृत्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले.
पुण्यामध्ये ते एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था आहे. त्याचा आदर ठेवला पाहिजे, पण ते न ठेवण्याची भूमिका काहीजण घेत असल्याचीही त्यांनी आठवण करून दिली.
मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था आहे. त्याचा आदर ठेवला पाहिजे, पण ते न ठेवण्याची भूमिका काहीजण घेतात. आणि तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करु शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर त्यामुळे माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर दोष देता येणार नाही. अलीकडे या पद्धतीची भूमिका काहीजण मांडत आहे. पण लवकरच हे सर्व शांत होईल अशी आशा करुयात. आम्हा लोकांची भूमिका मतभेद कसा वाढणार नाही आणि राज्याची जुनी परंपरा आहे ती कशी कायम राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असल्याबाबत त्यांनी आश्चर्य असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या विधीमंडळात अनेकदा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विरोधकांसोबत टोकाची चर्चा व्हायची. पण चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायचे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण दुर्दैवाने अलीकडे नको त्या गोष्टी पहायला मिळत आहेत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *