विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे भाजपाच्या भाई गिरकर यांची माघार

मुंबई : प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपसभापती पदासाठी भाजपाचे विजय भाई गिरकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु त्यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

महिलांचे प्रश्न सोडविण्यास नीलमताई यांचे कायम प्राधान्य असते.  महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या स्वतः धावून जातात. निलमताईंची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून  त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे शुभेच्छापर भाषण  करतांना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदस्य सर्वश्री जयंत पाटील, शरद रणपिसे, कपिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणेचा निर्णय संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश

शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *