नितेश राणे यांची मागणी, परिक्षेच्या कालावधीत बुरखा बंदी घाला भाजपाचे मंत्री नितेश राणे यांची शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी

राज्यात पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थिनींना बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.

पुढे आपल्या पत्रात मंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थिनींनी परिधान केलेल्या बुरख्यावर आक्षेप घेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना लिहिलेल्या पत्रात नितेश राणे म्हणाले की, मुस्लिम विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालू नये. जर विद्यार्थ्यांना बुरखा घालून परीक्षेला बसण्याची परवानगी असेल तर परिक्षेदरम्यान तपासणीसाठी महिला पोलिस अधिकारी किंवा शिक्षकांची नियुक्ती करावी. ही परिक्षा कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ न देता पारदर्शक पद्धतीने घेतली जाण्याची अपेक्षा असल्याचे यावेळी सांगितले.

नितेश राणे पुढे म्हणाले की, जर उमेदवारांना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात असेल तर राणे म्हणाले की, बुरखा घालून येणारा कोणताही उमेदवार कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करून परीक्षेत बसत आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही आपत्ती उद्भवल्यास सामाजिक आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि अनेक विद्यार्थ्यांना त्रास होईल. म्हणून परीक्षेत बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणीही यावेळी केली.
पुढे नितेश राणे म्हणाले की, राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश न देण्याबाबत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी केली.

मंत्री नितेश राणे यांच्या या मागणीनंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू शकते. कारण ही मागणी करून राणेंनी विरोधकांना एक आयता मुद्दा दिला आहे. नितेश राणे यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी ते सतत हिंदू आणि हिंदुत्वाबद्दल बोलत आले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून परिक्षेसाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. अशा परिस्थितीत मंत्री नितेश राणे यांनी परीक्षा केंद्रात बुरखा घालून प्रवेश करण्यास बंदी घालण्याची मागणी करून राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला आहे.

About Editor

Check Also

राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *