उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर खासदार श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती, केंद्रात संधी… सत्तेतल्या पदाची लालसा नाही

राज्यातील महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या तयारी भाजपाकडून करण्यात येत असताना आणि सत्तेत कोण कोण विराजमान होणार याबाबत सर्वच प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने भाजपामधील अनेक आमदार आणि नेत्यांची नावे जाहिर केली. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या गावी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे हे विराजमान होणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे अखेर या चर्चेवर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत आज खुलासा केला.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचा खुलासा केला.

पुढे आपल्या पोस्टमध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो असे सांगत माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी आपल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्रिपद खासदार डॉ श्रीकांत शिंदेंना मिळणार या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) होईल. त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल असेही यावेळी स्पष्ट केले.

त्यामुळे राज्यात उपमुख्यमंत्री पदावरून सुरु झालेली चर्चा खासदार तथा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांनी चर्चेला पूर्ण विराम दिला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *