राजकारण

आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी गटात दंगल घडविण्याचा सरकारचा प्रयत्न भारिपचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात हिंदू व मुस्लिम अशी धार्मिक दंगे होत नाहीत. त्यामुळे आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी यांच्यात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी केला. भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्याचे सत्र राज्य …

Read More »

मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरतेय नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात महाआघाडी असावी अशी देशातील जनतेची भावना असून देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. तसेच सर्व पक्ष पंतप्रधान मोदी आणि भाजप आणि आरएससच्या कारभाराच्या विरोधात एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना आहे. या भावनेला जोडण्याचे काम कॉग्रेस करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष …

Read More »

मागण्या मान्य करा अन्यथा सरकारविरोधात असहकार शेतकऱ्यांनंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने द्यावा यासह विविध मागण्यांच्या प्रश्नी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने मंत्रालयासमोर आज दुपारी आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मंत्रालयातील सरकारी कर्मचारी सहभागी झाले …

Read More »

२०१९ च्या निवडणूकासाठीच विनोद तावडे यांच्याकडून नाट्यसंमेलनाचा राजकिय वापर नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांचा आरोप : संमेलनाआधीच “वस्त्रहरणास” सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी उद्या बुधवारी अखिल भारतीय नाट्यसंमेलनास सुरुवात होत असतानाच मागील चार वर्षांपासून एकाही नाट्य समेंलनाला उपस्थित न राहणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे यावर्षी मुद्दाम हजर रहात आहेत. तसेच आगामी निवडणूकाच्या निमित्ताने जनसंपर्क अभियान मोहीमेचा भाग म्हणून ते हजर रहात असल्याचा आरोप नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी केला आहे. …

Read More »

शरद पवारांची रणनीती बीडमध्ये निष्प्रभ ठरल्याने सुरेश धस विजयी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना लगाम

बीड : प्रतिनिधी विधान परिषदेसाठीच्या बीड-लातूर आणि उस्मानाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील जागेसाठी झालेल्या निवडणूक राज्याच्या दृष्टीने औस्तुक्याचा विषय ठरली. ही जागा निवडूण आणण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे उमेदवार अशोक जगदाळे यांना भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्या विरोधात निवडूण आणण्यासाठी …

Read More »

मोदी सरकारचा ठेका पध्दतीचा निर्णय ‘संघाचा हेर’ मंत्रालयात बसवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय सेवेत अधिकाऱ्यांची ठेका पध्दतीने भरती करण्याचा मोदीसरकारने घेतलेला निर्णय कुठेतरी संघाचा हेर मंत्रालयामध्ये बसवण्यासाठी आहे. देश लुटण्यासाठी संघाला थेट युपीएससीच्या माध्यमातून तिकडे जाता येत नाही. त्या विशेष जागेवर बसवता येत नाही. त्यासाठीच या सरकारने हा नवीन मार्ग शोधला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब …

Read More »

मागासवर्गीयांच्या भरतीच्या चौकशीच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न मुख्य प्रवेशद्वारासमोर रॉकेल ओतून घेतले

मुंबई : प्रतिनिधी धुळे शहर महानगरपालिकेत १९८९ साली मागासर्गीयांची भरतीची सीआयडी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील रहिवासी बबन यशवंत झोटे या व्यक्तीने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हालचाल करून झोटे यास आत्महत्येपासून परावृत्त केले. महानगरपालिकेत सरळसेवा भरतीच्या माध्यमातून मागासवर्गीयांची झालेल्या …

Read More »

संभाजी भिडेला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांचा सरकारकडूनच बनाव ? गृह विभागाला सांगून खोटा अहवाल बनविल्याची दबक्या आवाजात मंत्रालयात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगांव येथे दलितांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात नक्षलवादी गुंतल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. मात्र या हिंसाचाराच्या मागील असलेला प्रमुख संशयित आरोपी संभाजी भिडेला अटक करण्याऐवजी त्याना वाचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाला सांगून नक्षलवाद्यांकडून …

Read More »

आगामी निवडणूकांसाठी काँग्रेस करणार महाआघाडी ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत काँग्रेच्या भविष्यातील दिशेसंदर्भात चिंतन

मुंबई : प्रतिनिधी आगामी निवडणुकींसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन जाण्याचे काँग्रेसचे धोरण आहे असे सूतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. आज गांधीभवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील दिशेसंदर्भात …

Read More »

शरद पवारांनी दाखविली पंतप्रधान मोदींना कामातील चूक साखर कारखान्यांना ८५०० कोटींचे पँकेज जाहीर होवूनही दाखविले ७ हजार कोटी

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने राज्यासह संपूर्ण देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी आणि साखरेच्या उत्पादनासाठी ८ हजार ५०० कोटी रूपयांचे पँकेज जाहीर केले. मात्र केंद्राकडूनच यासंदर्भात जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात साखर कारखाने आणि साखर उत्पादनासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पँकेज जाहीर करण्यात आल्याची चूकीची माहिती प्रसिध्द करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »