राजकारण

राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले, ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण पंचायत राज विभागाच्यावतीने पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले महत्व अधोरेखित

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत  या संस्थांनी मोठे योगदान दिले असून राज्यात पंतप्रधान आवास योजना व इतर गृहनिर्माण योजनेंतर्गत लाखो नव्या घरांच्या बांधकामास मान्यता मिळालेली आहे. ही गोष्ट अत्यंत समाधानकारक असून  मनरेगा, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार अनुदान द्या खरिपासाठी शेतक-यांना मोफत बियाणे व खते द्या!

राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्विकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण “वर्षा” या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित “अनादि मी.. अनंत मी…” या गीताकरिता राज्य शासनाच्या “छत्रपती …

Read More »

एसंशि शिवसेनाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप महिलेच्या वतीने वकील ठोंबरे यांचा संजय शिरसाट यांचा मुलगा सिध्दांत शिरसाटवर आरोप विवाहित महिलेसोबत लग्न करून मानसिक, शाररीक छळ

मागील काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांचे महिलांसोबतच्या अनैतिक संबधाच्या घटनां बाहेर येत आहेत. तसेच त्यासंदर्भात काही व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असताना आता एसंशि अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने एका विवाहीत महिलेला तिच्या पतीपासून चारच महिन्यात घटस्फोट …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई आणि मंत्रालय पाण्यात राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न

राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, …

Read More »

बंदींसाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि कारागृह विभागाकडून प्रयासला मुदतवाढ “प्रयास” मुळे हजारो बंदींच्या जीवनामध्ये होतोय सकारात्मक बदल

कारागृहातील बंदीजनांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे आवश्यक आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कारागृह विभाग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हा कार्यक्रम बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प म्हणून ओळखण्यात येतो. ‘प्रयास’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येतो. …

Read More »

अमित शाह यांचे आश्वासन, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू 'स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल

कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले? हाल होण्यास महानगरपालिका व राज्य सरकारच जबाबदार; मुंबईला लुटणा-या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाही

मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे चित्र …

Read More »

अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणेसह अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा मान्सूनच्या मुसळधार पाऊसाची अनेक जिल्ह्यात हजेरी

मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश… नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा

पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. दरम्यान, राज्यातील …

Read More »