नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चेच्या फेऱ्यात अडकलेले आणि नंतर एकला चलोचा नारा देत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच निशाणा साधत गरज सरो अन् वैद्य मरो अशी खोचक टीका केली.
वंचित बहुजन आघाडीनेही महाविकास आघाडीत सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीने चर्चेसाठी उपस्थितही राहिले. मात्र जागा वाटपाच्या मुद्यासह अन्य धोरणात्मक निर्णयावरून वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सहभागी न होता एकला चलो चा नारा दिला.
मात्र आज प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवरून उद्धव ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत म्हणाले की, गरज सरो आणि वैद्य मरो अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांच्यावर करत उच्च वर्णीय हिंदूनी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलीत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता असा उपरोधिक टीकाही केली.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, दलीत आणि बौद्धांने आता शहाणे व्हा.
तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही असा टोलाही लगावला.
दरम्यान, महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महायुतीच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. महाविकास आघाडीच्या आव्हानासमोर महायुतीतील सहभागी पक्षांचा टीकावही लागला नाही.
'गरज सरो वैद्य मरो'चे उत्तम उदाहरण –
उच्च वर्णीय हिंदू नी भाजपा ला मतदान केले आणि उबाठा शिव सेना किंवा महा विकास आघाडीला नाही.ह्या निवडणुकीत दलीत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआ ला मतदान केले.
पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या… pic.twitter.com/Qo2xEbBDq7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 17, 2024
Marathi e-Batmya