सुप्रिया सुळे यांच्या आरोपामुळे माझा राजकिय भाव वाढला भाजप आमदार प्रसाद लाड यांचा उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी पक्षात असताना मला पवार साहेब नेहमी सांगायचे क आरोप झाले की तो माणूस मोठा होतो, या शरद पवार यांच्या सांगण्यानुसार आता माझ्यावर सुप्रिया सुळे यांनी आरोप केल्याने माझा राजकिय भाव वाढल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला.

तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळीही मी बिझनेस मध्ये होतो. तेव्हाही हाच व्यवसाय करत होतो. शरद पवार यांचा ब्लु आयड बॉय होतो. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी माझ्याविरोधात ट्वीट करण्याआधी एकदा शहानिशा केली असती तर बरे झाले असते असे सांगत त्यांच्या ट्वीटने मला दु:ख झाल्याची भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

प्रसाद लाड यांच्या कंपनीवर मानवी तस्करीचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी  ट्वीट केले होते. त्यास उत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

 

About Editor

Check Also

राज्यात रॉकेल वितरणाचा मोठा निर्णय; प्रत्येक कुटुंबाला ३ लिटर मिळणार मार्च महिन्यापासून रॉकेल वितरणाला सुरुवात पण लवकरच किंत जाहीर करणार, शासन आदेश जारी

एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात तात्पुरत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *