प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर ग्रीड सोलर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज निर्मिती करून तीच ऊर्जा वापरण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹१३.०३ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून, यामुळे एसटीच्या ऊर्जावापरात मोठी बचत होऊन पर्यावरणपूरक पाऊल उचलले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या बसस्थानके, कार्यशाळा, कार्यालये आणि इतर आस्थापनांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढणार असून, दरवर्षी सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचा पारंपरिक वीज खर्च वाचणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नमुना नकाशे, तांत्रिक मान्यता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही दिले.

हा उपक्रम हरित ऊर्जा वापराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही बाबींमध्ये सकारात्मक परिणाम अपेक्षित असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत? एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर

एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर आहे.,“मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. एमपीएससी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *