खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनो शैक्षणिक शुल्कात वाढ करु नका वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

कोविड -19 या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी आज खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे, यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फी वाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही आणि त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपा रस्त्यावर म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ‘वोटचोरी’ पकडल्याने भाजपाचा तिळपापड, मोदी-शाह यांना झोपेतही राहुल गांधीच दिसतात पण वोटचोरांना शिक्षा होणारच.

दिल्लीतील रामलीला मैदानावरील ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या इंडिया आघाडीच्या अभूतपूर्व महारॅलीने दिल्लीतील मोदी सरकारला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *