राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरील उट्टे काढण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी होताना दिसत आहेत. त्यातच भाजपाच्या नेत्यांनी टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर शरसंधान साधत आव्हानही दिली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही भाजपा आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना काही नव्यानं आव्हानही दिली. त्यातच भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत एक आव्हान देत राहुल गांधी यांच्या तोंडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल दोन चांगले शब्द बोलून दाखवावे असे आव्हान दिले.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या आव्हानानंतर विरोधकांकडून काही काळ शांत घालविण्यात आला. त्यानंतर आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी महाराष्ट्राच्या प्रचारात एन्ट्री घेताच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना दिलेले आव्हान पूर्ण करत भाजपाच्या नेत्यांना नवं आव्हान दिलं. या नव्या आव्हानामुळे प्रियंका गांधी यांनी भाजपाची चांगलीच पंचायत करून ठेवल्याचं दिसून येत आहे.
आज शिर्डीतील प्रचारसभेत बोलताना प्रियंका गांधी-वड्रा म्हणाल्या की, माझ्या भावाच्या संदर्भात नरेंद्र मोदी सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात, मी राहुल गांधी याची बहिण आहे. मोदीजी ऐकून घ्या, की आमची विचारधारा, आमच्या पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत. मोदीजी ऐकून हे ही ऐकूण घ्या, परंतु शिवाजी महाराज यांचा अपमान ना बाळासाहेब ठाकरे आणि ना काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी सहन केला नसता असे सांगत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
तसेच पुढे बोलताना प्रियंका गांधी-वड्रा म्हणाल्या की, माझं आव्हानही ऐका असे आव्हान देत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी व्यासपीठावर उभं राहुन म्हणावं की, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकणार आणि जातीय जणगणना करणार असल्याचं जाहिर करावं असं आव्हान मोदी-शाह यांना देत त्या पुढे म्हणाल्या ज्या राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा काढली त्या व्यक्तीला तुम्ही आरक्षण विरोधी असल्याचं म्हणता असा पलटवारही यावेळी केला.
प्रियंका गांधी यांच्या या आव्हानाला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय उत्तर देणार हे पाहणे आता औत्सक्याचे ठरणार आहे.
Marathi e-Batmya