प्रियंका गांधी-वड्राजी एका महिन्याच्या आत घर खाली करा केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार एसपीजी आणि झेड प्लस सुरक्षा असली तरी त्यांना सरकारी निवासस्थानात राहण्याची तरतूद नाही. त्यामुळे त्यांनी एका महिन्याच्या आत घर खाली करावे अशी नोटीस केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना बजाविली आहे.
प्रियंका गांधी या सध्या काँग्रेसच्या नेत्या असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर गांधी कुटुंबातील प्रत्येकाला केंद्र सरकारकडून एसपीजी कंमान्डो आणि झेड प्लसची सुरक्षा पुरविण्यात येते. मात्र ही सुरक्षा दिल्याने सरकारी निवासस्थानात राहता येते असा याचा अर्थ नसल्याने लोधी इस्टेटमध्ये त्यांना देण्यात आलेले टाईप ६ बी, घर नं. ३५ हे सरकारी निवासस्थान रिक्त करावी अशी नोटीस बजाविण्यात आली. तसेच एक महिन्यात अर्थात १ ऑगस्ट २०२० पर्यंत जर हे घर रिक्त केले नाही तर त्या पॅनल चार्जेस, डॅमेज चार्जेस लावण्यात येईल असा इशाराही दिला.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *