Breaking News

पूजा खेडकर यांची स्पष्टोक्ती, समितीसमोर सर्व आरोपांची उत्तरे देईन मिडीया ट्रायल सुरु आहे पण सत्य बाहेर येईलच

मानसिक आणि डोळ्याच्या आधारे अंपगत्व असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करत आणि कमी उत्पन्न असल्याचे दाखवित क्रिमीलेयरच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळविल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांकडून रोज नवी माहिती पुढे येत आहे. त्यातच पूजा खेडकर हीच्या आईने शेतकऱ्याला पिस्तूल दाखवित धमकविल्याचे प्रकरणही उघडकीस आले आहे. त्यामुळे पूजा खेडकर हिच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीकडून लवकरच पूजा खेडकर हीला चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांना काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता म्हणाल्या की, समितीसमोर तिच्यावरील सर्व आरोपांची उत्तरे देईन. सध्या ही मीडिया ट्रायल आहे आणि लोक बघत आहेत. सत्य शेवटी बाहेर येईलच. भारतीय राज्यघटनेनुसार आरोप सिद्ध होईपर्यंत व्यक्तीला दोषी मानता येत नाही असेही यावेळी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पूजा खेडकर म्हणाल्या की, समितीसमोर मला जे काही लागेल ते मी सांगेन आणि समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असेही यावेळी स्पष्ट केले.

पूजा खेडकर यांनी यापूर्वी दोन वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली होती – एक दृष्टीदोष आणि दुसरे मानसिक आजार – बेंचमार्क अपंग व्यक्तींच्या श्रेणीतील कागदपत्रे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे सादर केली होती.

सूत्रांनी माहिती दिली की ऑन-प्रोबेशन आयएएस IAS अधिकाऱ्याने पुण्यातील हॉस्पिटलमधून तिसरे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला होता, ही विनंती वैद्यकीय सुविधेने नाकारली होती.

शारीरिक अपंगत्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने, विशेषत: लोकोमोटर अपंगत्व श्रेणीमध्ये, प्रशिक्षणार्थी आयएएस IAS अधिकाऱ्याने अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या होत्या. मात्र, तिची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे शक्य नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पुण्यातील औंध हॉस्पिटलमधून अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.

Check Also

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *