राहुल गांधी यांचा थेट सवाल, मोदीजी घाबरलात का?

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यातच पुन्हा एकदा भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यातच आज आंध्र प्रदेशमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधत निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राहुल गांधी यांनी अचानकपणे अदानी अंबानी यांच्यावरील आरोप का थांबविले असा सवाल उपस्थित करत अदानी अंबानी यांनी टेम्पो, ट्रकभरून पैसे दिले का असा खोचक सवालही राहुल गांधी यांना केला.

राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला उत्तर देताना थेट एक्सवर अपलोड केलेल्या व्हिडिओत म्हणाले, नमस्कार नरेंद्र मोदीजी, घाबरले आहात की काय, इतक्या दिवसात तुम्ही चार भिंतीच्या बंद खोलीत अदानी, अंबानी यांच्यावर बोलत आला आहात. मात्र यावेळी पहिल्यांदाच तुम्ही अदानी अंबानीवर सार्वजनिकरित्या बोलला आहात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पलटवार करत म्हणाले, अदानी, अंबानी यांच्यावरील आरोप अचानक थांबविले नाहीत असे सांगत नरेंद्र मोदी यांना कसे माहित की अदानी अंबानी हे टेम्पो, ट्रकभरुन पैसे देतात हे. या गोष्टी नरेंद्र मोदी हे स्वानुभवनावरून सांगत आहेत का? असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

तसेच राहुल गांधी पुढे म्हणाले की, अदानी अंबानी यांनी किती पैसे दिले आणि कोणाला दिले हे ईडी आणि सीबीआयला पाठवून चौकशी करावे असे आव्हान देत इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर कोणी कोणाला किती पैसे दिले याची चौकशी करणार असल्याची चौकशी करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला. मात्र जितके पैसे अदानी अंबानी यांना मोदींनी दिले तितकेच पैसे आम्ही जनतेला वाटणार असल्याचे सांगत देशातील जनतेला माहित आहे की, भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचा चालक आणि क्लिनर कोण आहे हे सगळं माहित आहे, अशी थेट आरोपही मोदी यांच्यावर केला.

About Editor

Check Also

बीडी कामगारांच्या थकीत किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश

किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडी कामगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *