राज्यातील हिंदी सक्तीवरून मुंबईसह राज्यातील तमाम मराठी जनांनी एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात लढा पुकारला. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीचा मुद्यापासून माघार घेत असल्याचे राज्य सरकारने जाहिर केले. त्यानंतर हिंदी भाषेच्या अनुषंगाने नव्याने एका समितीची स्थापना राज्य सरकारने केली. मात्र मराठी जणांच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने माघार घेतल्यानंतर सरकारच्या विरोधात विजयी मेळाव्याचे आयोजन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी येथे करण्यात आले. मेळाव्यास इतकी गर्दी झाली की, आयोजनाच्या ठिकाणी हॉलमधील सर्व जागा फुल्ल झाल्यानंतर बाहेर परिसरातही मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्याचे दिसून आले.
यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले की, मराठीच्या मुद्यावरून आपण एकत्र आलोय, त्यामुळे भविष्यातही एकत्र रहायला हवे, नाही तर पुढे भविष्यात हे (भाजपा) आपल्याला जाती-पातीत विभागणार असल्याचा इशारा मराठी जनांना दिला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्यामुळे आता आपल्याला अधिक सावध असलं पाहिजे, नाही तर पुन्हा आपल्यात फुट पाडली जाईल आणि आपल्या डोक्यावर हे बसतील. केवळ मराठी माणसांच्या एकीमुळेच राज्य सरकारने माघार हिंदी सक्तीवरून माघार घेतली असल्याचे सांगत आता मराठी म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. तर यापुढे आपल्याला एकत्रच रहावं लागेल असेही यावेळी सांगितले.
तर यावेळी बोलताना शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण मराठी म्हणून एकत्र आलो आहोत. तर यापुढेही एकत्र राहणार असून आपल्या आपल्यातील भांडणे आता नको असे सांगत यापुढेही आपणास कायम एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट केले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आता माझ्या भाषणाची गरज असेल असे वाटत नाही. माझ्या भाषणापेक्षा आमच्या दोघाचं एकत्र येणं आणि दिसण आज अनेकांसाठी महत्वाचं असल्याचे सांगत आम्ही दोघेही आमच्या आजोबांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि हे आमच्या मराठीच्या भूमिकेवर शंका घेत असल्याची उपरोधिक टीकाही यावेळी भाजपावर केली.
Marathi e-Batmya