केंद्रीय राज्यमंत्री तथा एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः पोलिस स्टेशनला जात पोलिसांत जाऊन तक्रार नोंदविली. मात्र त्यानंतर थोडी हालचाल होत एकाला अटक करण्यात आले. मात्र अद्यापही तीन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या नणंद तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर संताप व्यक्त करत टीकेची झोड उठविली. तसेच महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून गृहमंत्र्यांवरही प्रश्न उपस्थित केला. तत्पूर्वी रोहिणी खडसे यांनी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. अलिकडेच एक सर्व्हेक्षण आलं आहे, त्या सर्व्हेक्षणाच्या अहवालात आशिया खंडातील सर्वात असुरक्षित देशांपैकी भारत देश एक असल्याचे सांगण्यात आलं आहे. या यादीत भारताची तुलना होणं दुर्दैवी असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही, त्यामुळेच गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. जर राज्यात कायद्याचा वचक राहिला असता तर गुन्हेगारीच्या घटना घडल्या नसत्या. महिलांच्या सुरक्षितेबाबत सरकार निरूत्साही आहे. महिलांच्या सुरक्षेकडे त्याचं दुर्लक्ष होतय, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करणे गरजेचे आहे. मला वाटतं लाडक्या बहिणींच्या सुरक्षेकडेही लक्ष्य देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगितले.
रोहिणी खडसे रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी पुढे बोलताना म्हणाल्या की, त्या घटनेला १० दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. या तीन आरोपींना नेमकं कोणाचं पाठबळ आहे असा प्रश्न पडला आहे. त्यामागे असा कोणता आका आहे हे शोधायला हवं कोणाचं तरी पाठबळ मिळतय म्हणूनच ते इतके फरार असल्याचेही सांगत अन्यथा ते इतके दिवस फरार राहुच शकले नसते असाही सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मुली त्यांच्या सुरक्षेबद्दल काय बोलणार अशी भावना व्यक्त करत इतकी मोठी घटना घडूनही आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे माझी मागणी आहे की, सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा, माझी, तुमची कोणाचीही मुलगी असेल तर तीला संरक्षण मिळालं पाहिजे. ती सरकारची जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगितले.
या प्रकरणामागेमागील व्यक्तीबाबत विचारले असता रोहिती खडसे म्हणाल्या की, आता तो पोलिसांनी शोधावा, सरकारने शोधावा, त्या तिघांना कोणत्या आका कडून संरक्षण मिळत आहे. मला वाटत नाही की पोलिस स्वतःहून दुर्लक्ष करत करू शकतात असे मला वाटत नाही. गुन्हेरांना कोणी तरी पाठीशी घालत असल्यानेच ते इतके दिवस फरार राहु शकत आहेत. खरंतर या आरोपींना शोधणं पोलिसांना अवघड नाही. सरकारनं पोलिसांच्या पाठीशी उभ राहणं आवश्यक आहे. ही सरकारची जबाबदारी आहे असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya