केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ३३५ कोटींच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीस मंजुरी दिली असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी, हजारो रुग्णांनी घेतला 'महाआरोग्य शिबिरा'चा लाभ
आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात पारडी परिसरात उभारण्यात आलेल्या नागपूर स्कील सेंटरचे उद्घाटन
जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय महिनाभरात होणार असून हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम असे कौशल्य विकास विद्यापीठ ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली. विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने नागपुरात पारडी परिसरात एआयडी, टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशनच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार ५०० जणांना नियुक्तीचे आदेश महर्षी वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाचे भूमिपूजन
सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुल राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण
राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उडाण पुलाच्या बांधमांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी …
Read More »इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान, वाहन चालकांची निदर्शने वाहन चालकांकडून जंतरमंतर वर निदर्शने
‘राष्ट्रीय इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमा’ची (National Ethanol Blending Programme) घाईघाईने केलेली अंमलबजावणी आणि त्यामुळे होणारे नुकसान यांविरोधात निषेध करण्यासाठी रविवारी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर वाहनमालक एकत्र आले. सोशल मीडियावर यापूर्वी मांडले गेलेले मुद्देच येथे प्रत्यक्षरीत्या ऐकायला मिळाले. E20 इंधनाच्या अनिवार्य वापराच्या निर्णयाविरुद्ध भारतात झालेला हा पहिलाच प्रत्यक्ष (ऑन-ग्राउंड) निषेध होता. वाहनचालकांनी …
Read More »तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यात जुंपली दक्षिण-उत्तर भारत च्या विभाजना वरून टीका
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर उत्तर-दक्षिण विभाजनाला खतपाणी घातल्याचा आरोप करत जोरदार टीका केली. रेवंत रेड्डी यांना देशाचे विभाजन न करण्याचे आवाहन केले आणि प्रदेश कोणताही असो, प्रत्येकजण भारतीय आहे, असे ठामपणे सांगितले. एका व्हायरल व्हिडिओवर रिजिजू प्रतिक्रिया देत होते, ज्यामध्ये रेवंत रेड्डी यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय, खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता
नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …
Read More »छगन भुजबळ यांची माहिती, जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर करण्यात आला आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे
पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ आवश्यक असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विज्ञान भवन नवी दिल्ली येथे निवासी …
Read More »
Marathi e-Batmya