कायद्यातील तरतूदींच्या नेमकी उलटी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांची लोकसंख्या वाढीवरील नियंत्रणाच्या विरोधात समाजाचे नाव पुढे करत मांडली भूमिका

काही वर्षांपूर्वी साधारणतः जगभरातच अर्थात पश्चिम आशियाई देशातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करत अनेक देशांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने आणि उपलब्ध साधन संपत्ती सर्व लोकांना पुरवताना सरकारची दमछाक होऊ नये म्हणून हम दो हमारे दो चा नारा दिला. त्यात चीन सारखे राष्ट्र मागे राहिले नाही. चीनच्या धोरणानंतर भारतातही यासंदर्भात कायदा करत ज्यांना दोन पेक्षा जास्त मुले असतील त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय घेत त्यांची अंमलबजावणीही सुरु झाली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच विधानसभा, लोकसभा निवडणूकीतून माघार घ्यावी लागली. तर काही जणांनी पहिलीशी घटस्फोट घेत दुसरा विवाह केल्याच्या अनेक घटना उघडकीसही आल्या.

तर काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतांचे धुव्रीकरण करण्याच्या नादात मुस्लिम महिलांकडून जास्तीत जास्त मुलांना जन्म दिल्याचे वक्तव्य केले होते.

परंतु आज राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक यांनी समाजाच्या अस्तित्वाचा मुद्दा पुढे करत दोन पेक्षा जास्त मुले जन्माला घालावीत अन्यथा समाजाचे अस्तित्व धोक्यात येऊन ज्या समाजात कमी मुलं जन्माला येतात त्या समाजाचे अस्तित्व संपुष्टात येत असल्याचा दावा केला आहे.
नागपूरातील अंबाझरी येथील बीआर मुंडलेच्या शाळेत आयोजित कठाळे कुळ संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, समाज टिकविण्यासाठी दोन किंवा तीन अपत्यांची संख्या महत्वाची आहे. समाजाचे अस्तित्व राहिले पाहिजे अशी सर्वांची भूमिका असते. कारण ते आपले असते. ते किती चांगले की वाईट याचे मुल्यांकन नंतर ठरते, पण आपले असल्याने टीकावे. यासाठी दोन किंवा तीन पेक्षा कमी अपत्ये करून नये असेही यावेळी सांगितले.

मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, अलिकडे जगभरात अंहकार, कट्टरता, यामुळे भांडणे होत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या संस्कृतीचा प्रसार जगभर करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती जाती, भाषा किंवा क्षेत्रापुरती मर्यादीत नाही. आपल्याकडे मुल्यांना प्रथम स्थान दिले असून आपल्याकडे व्यक्ती समाजातील प्रमुख घटक नसून कुटूंब आहे. कुटूंब चालविण्यासाठी कुलनीती आवश्यक आहे. कारण यातून संस्कृती टिकणार असल्याचे मत व्यक्त केले.

तसेच हिंदू धर्मातील जाती-पाती संदर्भात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, मात्र जातीपातीला शास्त्रात स्थान नाही. मात्र कुटुंबात आचरण असल्याने अद्यापही समाजात जातीभेद असल्याचे दिसून येतो. मुळात हिंदू धर्म हे नाव नंतर आहे. सर्व मानवजातीच्या कल्याणाचा हेतू असलेला मानव धर्म फार पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचेही यावेळी सांगितले.

मात्र वास्तिक कायद्यातील तरतूदी आणि मोहन भागवत यांनी मांडलेले विचार यांची सांगड घालायची म्हटली तर पुन्हा एकदा कायद्यातील तरतूदींचा भंग होणार आहे. त्याचबरोबर भाजपा सत्तेत आल्यापासून मुस्लिम समुदायाला उद्देशून सातत्याने विधान करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.

About Editor

Check Also

टीईटी परिक्षे दरम्यान महिलांना मंगळसूत्र-दागिने काढायला लावले, अंबादास दानवे यांचा संताप संभाजी नगरमधील घटनेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

राज्यात टीईटी परिक्षा होत आहे. परिक्षेसाठी परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर जमा झाले. छत्रपती संभाजी नगर मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *