संजय निरूपम यांची काँग्रेसवर टीका, ओबीसी मतांसाठी केलेला ठराव निंदनीय काँग्रेस अधिवेशनात केलेल्या ठरावावरून निरूपम यांची टीका

ओबीसी मतांसाठी काँग्रेसने केलेला ठराव निंदनीय असल्याची टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांची आज केली. अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने त्यांच्या मूळ भूमिकेशी पूर्णपणे युटर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात ठराव न करता, काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याची काँग्रेसची भूमिका आहे, त्याचा तीव्र शब्दांत संजय निरुपम यांनी निषेध केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेस पक्षाची आजवर जी काही राष्ट्रीय अधिवेशन झाली त्यात देशासाठी, ग्रामस्वराज्यासाठी, आर्थिक उदारीकरणासाठी, बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे ठराव मंजुर केले होते. प्रत्येक अधिवेशनात काँग्रेसकडून भारतीय समाजात जाती, भाषा धर्माच्या नावाने विभक्त करणाऱ्या शक्तींचा विरोध करणारा ठराव केला जात होता, अशी आठवणही यावेळी करून दिली.

संजय निरुपम म्हणाले की, मात्र अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने पूर्णपणे यू-टर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात काँग्रेसने कोणताच ठराव केला नाही. याउलट काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याचा काँग्रेसचा छुपा अजेंडा असून त्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचेही यावेळी केला.

संजय निरूपम पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसची वाटचाल प्रादेशिक पक्षाच्या दिशेने सुरु झाली आहे. प्रादेशिक पक्षांकडून जाती धर्माचा आधारे व्होटबँकेचे राजकारण केले जाते, त्याप्रमाणे काँग्रेस राजकारण करणार हे निंदनीय आहे. ओबीसी मतांसाठी केलेला ठराव म्हणजे काँग्रेसचे दळभद्री राजकारण आहे, अशी घणाघाती टीका केली.

काँग्रेसच्या जाती-जमातीवर आधारीत ठरावाला उबाठाची सहमती आहे का, असा सवाल संजय निरुपम यांनी करत म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबई महापालिकेवर उबाठाची सत्ता होती मात्र कधीही ते नालेसफाईची कामे पाहण्यासाठी गेले नाहीत. या उलट त्यांनी रस्त्यांची कामे, नालेसफाई आणि इतर कामांमधून कमिशन घेतले. आता सत्ता गेल्याने आदित्य ठाकरे रस्ते आणि नालेसफाईची कामे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कामाची पाहणी करताना आदित्य ठाकरेंकडून कमिशन मिळवण्यासाठी कंत्राटदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त केला.

नालेसफाईच्या कामांची पाहणी हे आदित्य ठाकरेंचे ढोंग आहे, असा टोला संजय निरुपम यांनी लगावला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईत शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले, ज्यामुळे मुंबई खड्डेमुक्त झाल्याचे दिसून येते, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *