संजय निरूपम यांची टीका, दंगेखोरांची पाठराखण करणाऱ्या उबाठाचे औरंगजेब नवे आराध्य दैवत नागपूर हिंसाचारातील दोषींवर बुलडोझर कारवाईची मागणी

नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण कऱणाऱ्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. मातोश्रीवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना तैमुरची काळजी किती वाटते यापेक्षा संजय राऊत यांना महाराष्ट्रातील दंगलखोरांची खूप काळजी वाटतेय. मुस्लिम मतांसाठी मुल्ला संजय राऊत हिंदू विरोधी भूमिका घेत असल्याची खरमरीत टीका निरुपम यांनी केली. नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे. त्यांची मालमत्ता विकून शासनाने नुकसान भरपाई वसूल करावी. नागपूर शहरातील संशयित दंगेखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना संजय निरूपम म्हणाले की, नागपूर हिंसाचारात आतापर्यंत १०४ संशयतांना अटक झाली आहे. काल अटक झालेला सोशल मिडिया इन्फ्लुअंर्स हा इंडियन मुजाहिद्दीन संघटनेशी संबधित आहेत. यापूर्वी मोमीनपुरात काही सोशल मिडिया इन्फ्लुएंर्सने आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. मुस्लिम मतांसाठी उबाठा गट या संशयित लोकांची पाठराखण करत आहेत, यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असे निरुपम म्हणाले. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे मुस्लिमधार्जिणी भूमिका घेऊन हिंदु लोकांची बदनामी करत आहेत, असा आरोपही यावेळी केला.

संजय निरूपम पुढे म्हणाले की, उबाठाने हिंदुत्वापासून युटर्न घेतला आहे. केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला उबाठाने विरोध केला आहे. यासाठी देशातील मौलानांबरोबर उबाठाने बैठक केली. या बैठकीसाठी मुल्ला संजय राऊत यांनी प्रयत्न केले. मुस्लिम मतांसाठी उबाठाने विचारांशी तडजोड करुन प्रो मुस्लिम भूमिका घेतली. ज्या प्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुस्लिमांची पाठराखण करतात. स्वर्गीय मुलायम सिंग यांनी मुस्लिमांची बाजू घेतली होती. त्यावरुन त्यांना मुल्ला मुलायम असे बोलले जात होते, आता तशाच प्रकार उबाठाचे खासदार संजय राऊत हे मुल्ला संजय राऊत झाले आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली. दिशा सालियन प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर कोर्टाने गांभीर्याने विचार करुन पोलीसांना नव्याने तपास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *