संजय शिरसाट यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी २५ कोटींची तरतूद स्मारकाच्या जागेची पाहणी, १५ दिवसात जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने २५ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सद्यःस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे  यावेळी सांगितले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, आमदार डॉ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अशोक काकडे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबातील सदस्य सचिन साठे उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीला भेट देऊन शिल्पसृष्टीची ही पाहणी केली तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

About Editor

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *