Breaking News

माफीवरून शरद पवार यांची टीका, विषय काय, हे काय बोलत आहेत सावरकरवरून विरोधकांवर केलेल्या टीकेचा घेतला समाचार

मालवण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला पुतळा कोसळला. त्यावरून राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यातच शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी वाईटातून चांगले घडत असे वक्तव्य केल्यानंतर तर या राजकिय घमासानीत आणखी भरच पडली. हे काय कमी होते म्हणून की काय मुख्यमंत्री शिंदे यांनी पुतळा पडण्यामागील कारण सांगाताना ताशी ४५ किमीने वारे वहात होते म्हणून पुतळा पडल्याचे वक्तव्य केले. त्यावरून तर महायुती सरकारवर सर्वच बाजूंनी टीका सुरु सुरु झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माफी मागण्याची तयारी दाखविली, पण स्पष्ट शब्दात माफी मागितली नाही. त्यावरूनही राज्यातील विरोधकांसह जनतेतूनही प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली.

या सगळ्या घडामोडीत पालघर येथील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले. त्यावेळी भाषणाच्या सुरुवातीला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याप्रकरणी नम्र भावनेने माफी मागितली नाही. उलट हे आमचे संस्कार असल्याचे सांगत स्वा.सावरकर यांचा मुद्दा उपमस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून टीका केली जाते. मात्र त्यांच्याप्रती माफी मागितली जात नसल्याचे सांगत एक वेगळाच संदेश राज्यात देण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान मोदी यांच्या या माफीनाम्याची दखल राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज घेत पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, पुतळा कोसळला आणि पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितल्याचं सांगितल जातं. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकर यांच्यावर टीपण्णी करण्यात येतं. त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळा पडला. पण विषय काय, लोकांची अवस्था काय आता विषय काय आहे हे बोलत काय आहेत आता छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर अशी तुलना होऊ शकते असा सवालही यावेळी केला.

शरद पवार पुढे म्हणाले की, ज्यांनी रयतेचं राज्य आणलं त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे पाहिलं. याचा अर्थ चुकीच्या गोष्टी चुकीच्या विचारांना प्रोस्ताहीत करता अंगाशी आली की माफी मागून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करतात अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

हे ही वाचाः-

पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांची माफी मागतानाही राहुल गांधींवर टीका

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मुस्लिम समाजाची स्थिती चिंताजनक आहे. द्रारिद्र्य रेषेखाली असलेल्या मुस्लिमांची संख्या दुर्लक्ष करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादीत संधी मिळते त्यामध्ये मुस्लिम समाजाचे घटक अधिक असतात, मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोन समाजातील काही घटकांचा असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *