Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, सरकारमधील दोघेजण काय बोलत होते आम्हाला माहित नाही अजित पवार यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आधी सहकाऱ्यांशी बोलू

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा समाजाकडून आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरु आहे. या दोन्ही आंदोलकांशी राज्य सरकारमधील एक बाजू मराठा आंदोलकांशी चर्चा करत होत. तर सरकारमधील दूसरी बाजू असलेले काही मंत्री ओबीसी समाजातील लोकांशी संवाद साधत होते. सरकारमधील या दोन्ही बाजूंनी कोणी काय आश्वासन दोन्ही समाजाला दिले आणि कोणाशी काय बोलणी केली याबाबत राज्य सरकारने विरोधकांना कोणतीही माहिती दिली नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांची भूमिका जाणून घेण्यासाठी बैठक बोलविली. आता सरकारने या दोघांशी काय बोलणी केली याची कोणतीच माहिती नसताना आमची भूमिका जाणून घेण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्यावर आम्ही आमची भूमिका कशी जाहिर करणार असा खोचक सवाल करत सरकारकडून माहिती कळविल्याशिवाय मार्ग काढता येणे शक्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. त्यावेळी ते बोलत होते.

तत्पूर्वी पिंपरी चिंचवड शहराचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील मोदीबाग येथे पक्षप्रवेश करण्यात आला. भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, छगन भुजबळ हे मध्यंतरी बारामतीत आले होते. ते जे काही बोलले ते टीकात्म होतं. मात्र कदाचित केलेली टीका त्यांच्या जिव्हारी लागलेली असल्याने ते मला भेटायला आले. यावेळी राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन्ही समाजात वाद वाढतील असे सांगितलं. त्यावर मार्ग काढायचं असेल सरकारने कोणाशी काय बोलणी केली, कोणाला काय सांगितलं हे कळल्याशिवाय कसं ठरविता येणार असा प्रतिप्रश्न करत वास्तविक पाहता राज्य सरकारने अशा वेळी संयमाची भूमिका घेणं आवश्यक होते. मात्र सरकारमधील दोन्ही बाजू दोघांशी बोलत राहिले. पण मी राज्यात शांतता स्थापित व्हावी या बाजूचा असल्याचे सांगण्यासही यावेळी विसरले नाहीत.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात ज्या काही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि लाडका भाऊ योजना जी काही जाहिर करण्यात आली. त्यास लोकसभा निव़डणूकीत महाविकास आघाडीला झालेले मतदान कारणीभूत असल्याचे सांगत राज्यातील लोकांचा कल पाहिला तर भावाची बहिणीला आणि बहिणीला भावाचा त्रास होत नाही असा खोचक टोला अजित पवार यांचे नाव न घेता लगावत कदाचित लोकसभा निवडणूकीतील मतदानामुळेच बहिणीची काळजी करण्याची आणि भावाची काळजी करण्याची वेळ राज्य सरकारवर आल्याचे दिसून येथे असा हलका चिमटाही यावेळी काढला.

तसेच महाविकास आघाडीने बेरोजगारीच्या मुद्यावरून तरूण-तरूणींना दिलेल्या आश्वासनावरूनच राज्य सरकारने या दोन्ही योजना जाहिर केल्याचेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत शेकापचे जयंत पाटील यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना सवाल केला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्याबाबत आमच्यात चर्चा झाली नव्हती. मात्र जंयत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला तर राष्ट्रवादी काँग्रेसची १२ मते त्यांना देणार असे आमच्या पक्षाच्या वतीने जाहिर करण्यात आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसने त्यांचा प्रत्येकी एक एक उमेदवार उतरविला होता. या तिन्ही उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी एक रणनीती ठरविण्यात आली होती. शिवसेना उबाठा आणि काँग्रेसने त्यांच्या पहिल्या पसंतीची मते देऊन जी दुसऱ्या पसंतीची मते आहेत ती जयंत पाटील यांना देण्याचे ठरविण्यात आले होते. तसेच जी दुसऱ्या पसंतीची मते असतील ती विजयासाठी कमी पडणाऱ्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची म्हणून द्यायची असे ठरविण्यात आले होते. मात्र ही रणनीती यशस्वी झाली नसल्याचेही यावेळी सांगितले.

शरद पवार साहेब म्हणाले की, जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं, असेही यावेळी सांगितलं.

अन्य एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने अजित पवार गटातील अनेक नेते पुन्हा तुमच्यासोबत येत आहेत. तसेच अजित पवार यांनी पुन्हा तुमच्या पक्षात येत असतील तर त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार का असा सवाल केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, घरात सर्वांना जागा आहे. मात्र जर त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा असेल तर त्यासंदर्भात सर्वात आधी संघर्षाच्या काळात जे सोबत राहिले त्यांना आधी मला विचारावे लागेल. मी त्याबाबत एकटा निर्णय घेणार नसल्याचेही यावेळी स्पष्टपणे सांगितले.

माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं. आमच्या इथे कॉलेजात एक जादूगार राहत होते. त्यांची भेट घ्यायचो. काही जादू शिकता येते का ते पाहायचो. चेष्टेचा भाग सोडून द्या. तुम्हाला भेटता आले याचा आनंद आहे,  शरद पवार यांनी सांगितले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, अरे ती बारामती आहे. लोकांशी वैयक्तीक संबंध ठेवले पाहिजेत. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी ५० टक्के लोकांना नावाने ओळखायचो. पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील. घरात सगळ्यांना जागा आहे. पक्षात जागा आहे की नाही हा व्यतिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीनं उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेल आणि ते तयार झाले तर मग काय असेल तो निर्णय घेईन असे सांगत आता जनरेशन गॅप झाली आहे. एकदा मी मुख्यमंत्री असताना बारामतीतील एक मतदार माझ्याकडे आली. मुख्यमंत्र्यांच्या दालनात आल्यानंतर मी त्या व्यक्तीला नावानिशी हाक मारली. तर त्या व्यक्तीने इकडे मतदारसंघात येऊन सांगितले की, शरद पवारांनी मला नावानिशी हाक मारली. अशा पध्दतीची लोकांशी व्यक्तीशं सबंध संवाद असला लोकं तुम्हाला कधी विसरत नाहीत असे सांगायलाही यावेळी विसरले नाहीत.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *