विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्यातल्या जनतेसाठी पंचसूत्री जाहिर केली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचा वचननामा अर्थात जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी छोटेखानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वचननामा काय आहे याची माहिती दिली.
कुटुंबप्रमुखांचा वचननामा!
अन्नसुरक्षा: शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार. pic.twitter.com/8H7aJiDZa3
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 7, 2024
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसात महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रकाशित होईलच बारीक-सारीक गोष्टी आहेत त्या आम्ही शिवसेना उबाठाच्या वचननाम्यातून ती वचनं राज्यातील जनतेसाठी देण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
कुटुंबप्रमुखांचा वचननामा!
आरोग्य: प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार. pic.twitter.com/g9DkKGfDhz
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 7, 2024
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही महायुतीत होतो तेव्हाही वचननामा आणला होता. तसंच आता महाविकास आघाडीत असतानाही वचननामा आम्ही आणत असल्याचे सांगत मुंबई आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे आणि गावठाण यांच्याकडे आता सरकारची वाकडी नजर पडली आहे. या कोळीवाड्यांचे क्लस्टर डेव्हल्पमेंट करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय ते सगळं एकत्रित करायचं आणि टॉवर बांधून द्याचे आणि बाकीची जमिन ही त्यांच्या मित्राला त्यांच्या घशात घालायची असा हा सगळा प्रकार त्यांनी सुरु केलेला आहे. पहिल्यांदा हा काळाकुट्ट जीआर रद्द करून कोळीवाड्यांच अस्तित्व यांची ओळखं आम्ही कदापी विसरू देणार नाही. या सर्वांना मान्य होईल असा विकास आम्ही करणार असल्याचा विश्वासही यावेळी दिला.
कुटुंबप्रमुखांचा वचननामा! pic.twitter.com/KtMnrSegVj
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 7, 2024
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, धारावीच्या माध्यमातून पूर्ण बकालपण मुंबईत आणण्याचा डाव सरकारचा आहे. तो देखील आम्ही हाणून पाडणार आहे. धारावीत चार-पाच लाख नागरिकांची लोकवस्ती आहे. त्यातील अर्धी अधिक लोक हे अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची दहिसर मिठागर या ठिकाणं पाठवायची योजना आहे. मात्र धारावीकरांना धारावी सोडायची नाही आणि बाकिच्यांनाही समजत नाही की नागरी सुविधांवर ताण पडणार आहे. आताच्या निविदेप्रमाणे किंवा नियमबाह्य सवलतीप्रमाणे धारावीचा विकास करायचे ठरवलं आहे. तर मुंबईवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा भार पडणार आहे. जर कॅलक्युलेशन केलं तर हजारो एकर जमिन ही आजच अदानींना दिली आहे. त्याच्याबाबत आदेश दिलेले आहेत. सरकारचा हा डाव हाणून पाडायचा असल्याचा इशाराही यावेळी दिला.
कुटुंबप्रमुखांचा वचननामा!
पेन्शन: सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार. pic.twitter.com/r32OOdx3hT
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 7, 2024
कुटुंबप्रमुखांचा वचननामा!
आरोग्य: प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार. pic.twitter.com/g9DkKGfDhz
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 7, 2024
Marathi e-Batmya