उध्दव आपडा चे नंतर आता शिवसेनेचे “জয় বাংলা” ! (आनंद बांग्ला) शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

देशातील इतर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत उतरून प्रांतिक असलेल्या शिवसेनेने राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली वाटचाल सुरु केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशपाठोपाठ आता शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

भाजपाला पर्याय ठरण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी गेल्या काही वर्षापासून जाणीवपूर्वक गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणूकीच्या राजकारणात आपले उमेदवार उभे करत शिवसेना फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत नसल्याचा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या सर्व राज्यात शिवसेनेला यश मिळाले नसले तरी त्याची चर्चा मात्र नक्कीच झाली. त्यामुळे आता भाजपाच्या विरोधात आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मदतीसाठी म्हणून शिवसेना तेथील आगामी विधानसभेच्या निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालच्या निवडणूकीत शिवसेनेने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, नरेंद्र मोदींचा ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *