चड्डी-बनियन व्हिडीओवरून अनिल परब यांचा टोला, सरकारने किमान दोन कपडे तरी द्यायचे बेडरूम पर्यंतचे व्हिडिओ लीक कसे होतात, यंत्रणा पोखरलीय

नुकतेच काही मंत्र्यांचे चड्डी-बनियनवरील व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे आता मंत्रीही सुरक्षित राहिले नाहीत. तर जनती सुरक्षा तर बाजूलाच राहिली असा उपरोधिक टोला शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी लगावत, चड्डी बनियन मध्ये सगळे उघडे फिरत आहेत. सरकारने किमान त्यांना दोन कपडे तरी पुरवायचे असा खोचक टोलाही शिंदे गटाचे आणि मंत्र्यांचे नाव न घेता विधान परिषदेत लगावला.

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, आमचं म्हणणं आहे जनतेची सुरक्षा तर ठेवा बाजूला पहिला मंत्र्यांची सुरक्षा करा. कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरताहेत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्राच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येतात. आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाची किती नाचक्की होते की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येतात मंत्री सुरक्षित नाहीये असा उपरोधिक सवालही यावेळी केला.

अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, मंत्र्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज आणि जाहीर कार्यक्रमात पुन्हा सांगताहेत की पैसे कमी पडले तर आम्ही देऊ पैशाची बॅग दिसते आणि त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की, हे इव्हेंट कसे होतात महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षित नाहीये अधिवेशन चालू आहे, जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाहीये आणि इथे जरा सुरक्षा विधेयक आणले जात आहेत तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या सुरक्षेतेसाठी आणि त्याच्या खोलीत पैशाची बॅग दिसते, ज्याच्यावरती इन्कम टॅक्सी नोटीस आहे तरी देखील थेट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवतो असेही यावेळी सांगितले.

शिंदे गटाचे आणि त्यांच्या मंत्र्यांचे नाव न घेता अनिल परब म्हणाले की, हे सगळे उघडे राज्यात फिरत आहेत. त्यामुळे अगदीच काही नाही तर सरकारतर्फे दोन दोन कपडे तरी या उघडे फिरणाऱ्यांना वाटप करायचे होते. काय चाललंय की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येतात याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीये मी बेडरूम मध्ये सूट घालून झोपा असं सांगितलं नाही आहे माझं म्हणणं असे आहे की, बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा पोखरली गेली असल्याचा आरोप करत हा डिजिटलायजेशन फ्रॉड आहे. जो हा मंत्राच्या घरापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांचे काय सुरक्षित राहील म्हणून याची हे व्हिडीओ फॉरेन्स लॅबमध्ये पाठवून ते व्हिडीओ खरे की खोटे याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच या व्हिडिओच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा आणि पहिले मंत्र्यांना सुरक्षा द्या आणि नंतर जनतेला सुरक्षा द्या असं माझं आपल्याकडे म्हणणे असल्याचेही यावेळी सांगितले.

अनिल परब पुढे उपरोधिक टीका करताना म्हणाले की, याच्यावरती माझी इच्छा आहे की आपण सविस्तर चर्चा घ्यावी, अडीच तासाची चर्चा ठेवा मंत्रांच्या सुरक्षिततेसाठी त्याचं कारण असं आहे मंत्रीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय सुरक्षित राहणार आणि म्हणून मंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण कुठल्या नियमा खाली हा विषय घेणार आहे याचं रुलिंग आपण द्यावे अशी मागणही विधान परिषदेत केली.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *