महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या उत्तर प्रदेश प्रशासनाने खोटी सांगितली आहे; योगी आदित्यनाथ यांनी केलेले हे सर्वात मोठे कव्हर-अप आहे. मृत भाविकांची संख्या लपविण्यासाठी, योगी आदित्यनाथ यांनी भाविकांचा मृतदेह हिंदू रीती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार न करता भट्टीत दहन केले आहे.
ॲड. आंबेडकरांनी या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारलेले प्रश्न –
-योगी आदित्यनाथ, या १००० हून अधिक भाविकांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात की पंतप्रधान मोदी?
-योगी आदित्यनाथ, या १००० हून अधिक मृत भाविकांच्या कुटुंबियांना तुम्ही काय उत्तर द्याल?
-कोणीतरी तिचा नवरा गमावला आहे, कोणीतरी तिचा भाऊ गमावला आहे तर कोणीतरी तिचा बाप गमावला आहे! तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल?
-योगी आदित्यनाथ, हिंदू विधी न पाळता त्यांच्या हिंदू भक्तांचे मृतदेह भट्टीत का जाळले?
शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एखाद्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करणे किती महत्त्वाचे आहे, हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांनी खोटे बोलून आणि हिंदू विधी न पाळता त्यांचे मृतदेह भट्टीत जाळून १००० हून अधिक हिंदू भाविकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना फसवले असल्याचा आरोप केला.
यूपी प्रशासन द्वारा बताई गई महाकुंभ भगदड़ में मरने वाले श्रद्धालुओं की संख्या झूठी है; ये योगी आदित्यनाथ का सबसे बड़ा कवर-अप है।
योगी आदित्यनाथ ने मरने वाले श्रद्धालुओं की संख्या को छुपाने के लिए मृत श्रद्धालुओं के शवों को बिना हिन्दू रीति-रिवाज के भट्टी में जलवा दिया है।
मुझे… pic.twitter.com/UGvShj4bhf
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 8, 2025
Marathi e-Batmya