ाज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढीवर (एक्सटेन्शनवर) असलेल्या निवृत्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवित त्यांच्या जागेवर संजय वर्मा यांना निवडणूकीच्या कालावधी पुरती पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आणला गेला. मात्र त्यानंतर संजय वर्मा यांच्याकडे असलेला पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार स्विकारण्यासंदर्भात राज्य सरकारकडून शासन आदेश जारी करण्यात आले.
ास्तविक पाहता निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला आणि मुदतवाढ मिळालेल्या अधिकाऱ्याला त्या पदावर असल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सदर अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविता येत नाही. त्याचबरोबर कालावधी पूर्ण होण्याआधीच जर त्या अधिकाऱ्याला निवडणूकीचे कारण पुढे केल्यानंतर सदर अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविल्यास किंवा त्या अधिकाऱ्याची बदली करता येत नाही. सदर अधिकाऱ्यास देण्यात आलेला मुदतवाढीचा कालावधी आपोआपच संपुष्टात येतो. तसेच त्या अधिकाऱ्यास पुन्हा पदग्रहण करता येत नाही. तशी तरतूद राज्य नागरी सेवेतही आहे. असे असताना राज्य सरकारकडून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावर नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले.
त्यामुळे सत्तेवर विराजमान होण्याआधीच राज्य सरकारकडून पोलिस महासंचालक पदावर पुन्हा एकदा मर्जीतील रश्मी शुक्ला यांना पुन्हा एकदा पोलिस महासंचालक पदावर विराजमान होण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
ोलिस महासंचालक पदावर पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्य सरकारने विराजमान होण्याआधीच पहिले नियमबाह्य नियुक्तीचे देश जारी केल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने जारी केलेले हेच ते आदेश

Marathi e-Batmya