सुधीर मुनगंटीवार माहिती, बांबू आधारित व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देणार

बांबू आधारित व्यवसायाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे बांबू उत्पादक शेतक-यांच्या विविध विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.यावेळी वन विभागाचे प्रधानसचिव बी वेणूगोपाल रेड्डी,नाबार्डचे महाप्रबंधक डॉ.प्रदीप पराते,एमडीबीचे एडी महाव्यवस्थापक पी कल्याणकुमार यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शेतकरी समुहासाठी बांबू उत्पादक समूह नाबार्डच्या सहयोगाने प्रकल्प तयार करण्यासाठी बांबू क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर शासनाने भर दिला आहे. ससमिरा, वरळी मुंबई यांचे मार्फत बी.आर.टी. ला बांबूपासून वस्त्रोद्योग निर्मितीसाठी संशोधन प्रकल्प सादर करण्यात आला आहे वन विभागाने समिती नेमून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मुंबई यांचेकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे बांबू आधारित स्किल डेव्हलमेंटकरिता व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा.राज्यातील विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सामुहिक उपयोगिता केंद्राना सूक्ष्म उद्योगाचा दर्जा देणे याबाबत विभागाने कार्यवाही करावी.

राज्यातील विविध क्षेत्रातील महिलांना बांबू आधारित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीमध्ये अथवा नाविन्यपूर्ण योजनेर्तंगत निधीची तरतूद करावी,अशा सूचनाही यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत केल्या.

About Editor

Check Also

Nagpur Blast

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन स्फोटक कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी प्रक्रिया ऑटोमेशनवर भर

स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *