महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारु दे लालबागच्या राजाकडे दादा-ताईंचे साकडे

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते.
अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी राज्य आज आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. बलात्कार,महिला अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती नीटनेटकी होवो अशी प्रार्थना राज्यातील जनतेच्या वतीने केली.

About Editor

Check Also

दादाजी भुसे यांची माहिती, शाळांच्या सुविधा उभारणीसाठी विविध स्रोतांतून निधीचा प्रभावी उपयोग सीएसआर फंड, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी निधी वापरणार

राज्यातील शाळांची भौतिक सुविधा सुधारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, तसेच मनरेगा अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *