पद्मविभूषण देणारेच विचारतायत पवारांनी काय केले खा.सुप्रिया सुळे यांचा भाजपावर पलटवार

दौंडः प्रतिनिधी
शरद पवार साहेबांना पद्मविभुषण ही पदवी तुमच्या सरकारने दिली आहे ना ? मग ५० वर्ष शरद पवारसाहेबांनी काय केले कसं विचारता, त्यांनी काम केले नाही तर मग त्यांना ही महत्त्वाची पदवी का दिलात असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मोदी सरकारला केला.
सध्या सत्तेत असलेल्या लोकांमध्ये पोरांना पळवणारी टोळी कार्यरत आहे. परंतु या टोळीला पोरी पळवण्याची हिम्मत आमच्यासारख्या मुलींमुळे कोणाची झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
माझ्या बारामतीवर सगळ्यांचं प्रेम आहे. कारण माझी बारामती आहेच तशी अशा शब्दात बारामतीचे कौतुक करतानाच बारामती सर्वांना हवीहवीशी वाटते. अनेक दिग्गज नेते त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ११ सभा होणार आहेत. हेच माझ्या बारामतीचे यश असल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
माझी बारामती तुम्हाला हवीहवीशी वाटते ना मग ४ वर्ष ११ महिने तुम्ही कुठे होतात असा सवालही त्यांनी केला.
या देशाच्या संसदेमध्ये उत्तम गुणांनी अव्वल नंबरने पास झालेले आहे. पाच वर्ष सत्तेत आणि पाच वर्षे विरोधातील खासदार म्हणून काम केले. आणि यापुढेही तुमची सेवा करण्याची संधी तुमच्यामुळे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेत डॉ. अमोल कोल्हे, कुमारी सक्षणा सलगर, रमेश थोरात यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या सभेत भाजप – सेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे,शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रामराव वडकुते, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर,रमेश थोरात, दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार आदींसह महाआघाडीचे नेते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *