सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी रामकृष्ण हरिवाली, मटण खालेलं माझ्या पांडुरंगाला चालत… मी माळ कधी घालत नाही, पण मटण सोडून दिलं तर माळ घालीण

मी रामकृष्ण हरीवाली, पण माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खाते. खरं बोलते बाई मी काही त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. मी मटण खाल्ल तर माझ्या पांडुंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही ?, आमचे आई-वडील खातात, नवरा खातो, सासू-सासरे खातात आणि आम्ही आमच्या पैशाने खातो बाबा, दुसऱ्यांच काही नाही आपलं. आपण कुणाला मिंधे नाही. जे आहे ते डंके की चोट पे है असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं.

नाशिकमधील एका कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे या उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी विचारले असता म्हणाले की, मी याबाबत काही बोलणार नाही. याचं उत्तर महाराष्ट्रातील जनताचं देईल असे एका वाक्यात उत्तर देत विषयच संपवून टाकला.

त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर ट्विट करत संत तुकारामच्या अंभगाचा दाखला देत म्हणाले की, जेवणेंही नाम घेऊनी करावे परि करू नये जीव हिंसा या अभंगाचा दाखला देत भगवंताचे नाव घेऊन जेवण करावे, हिंसा करून कुणाला मारून खाऊ नये असा संस्कार देणाऱ्या तुकोबारायांच्या मराठमोळ्या महाराष्ट्रात सोयीचा विठ्ठल आणि सोयीच्या विठ्ठल भक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली आहे. विठ्ठलभक्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबातील माळकरी कधीच मांसाहारकडे वळत नाहीत, वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतानाच मांसाहार वर्ज्य करण्याचे वृत सुरु होते. आणि रोज हरिपाठाचा परिपाठ सुरु होतो. हिंसा करणार नाही, दारू पिणार नाही. दिंडी सहभाग सात्विक आहार व उपवास असे पंच नियम पाळून माळ धारण करतात, आणि पिढ्यान पिढ्या ही माळ जपली जाते असेही त्या पोस्टमध्ये म्हटले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’साठी कंपनीची स्थापना करणार जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *