राष्ट्रवादीसह या तीन पक्षांना प्रादेशिकतेचा दर्जा, तर आम आदमी राष्ट्रीय पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह पश्चिम बंगालमधील ममता बँनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांना असलेला राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता काढून घेतली आहे. मात्र दुसऱ्याबाजूला आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला.

विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीसह ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘तृणमूल काँग्रेस’ या अन्य दोन पक्षांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयनंतर राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले, निवडणूक आयोगानं जो काही निर्णय घेतला आहे, त्याची अधिकृत माहिती आम्हाला अद्याप प्राप्त झाली नाही, त्यांच्या निर्णयाची प्रत आम्हाला मिळाल्यानंतर निश्चित यावर कायदेशीर विचार करावा लागेल. कारण १५-२० दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जाबाबत आमची बाजू मांडण्याची मुभा दिली होती.

About Editor

Check Also

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. फडणविसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’

बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *