Breaking News

उद्धव ठाकरे यांचा सवाल, अब्दाली शाहचा वंशच, वळ बघायला आला होता का? धनुष्यबाण हटवा, मला मशाल हवीय शाखे शाखेंच्या फलकावर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या मशालीने भाजपाचा पराभव केला. तरीही मध्यंतरी बालेवाडीत एकमेकांच्या पाठीवर पडलेले वळ बघायला अब्दाली शाहचे वंशच इथे आले होते का असा सवाल करत तो अब्दाली शाह तो होता. आताचा अमित आहे हे विसरू नका असे सांगत जशी औरंगजेबाची कबर इथे महाराष्ट्रात बांधली तशी भाजपाची कबरही महाराष्ट्रात बांधा म्हणजे अब्दाली शाह आणि भाजपाची होणारी वळवळ बंद होईल असे आवाहन शिवसैनिकांना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत माझ्यावर औरंगजेब फॅन क्लबचा प्रमुख टीका करता तुम्हीच तर अब्दाली शाहच्या वंशजाचे वारसदार असून औरंगजेबाच्या जन्म जसा गुजरातमध्ये झाला, तसा तुमचाही झाला अशी खोचक टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेत केली.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्यावतीने शिवसंकल्प मेळावा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव, सुषमा अंधारे आदींची भाषणे झाली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर टीका करताना अब्दाली शाहचे वंशच म्हणाले की, मी हिंदूत्व सोडलं म्हणून, पण हिंदूत्व सोडलं म्हणजे काय केलं हे सांगत नाहीत. बर मी का हिंदूत्व सोडावं असा सवाल करत ज्यांनी नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक पाकिस्तानात जाऊन खाऊन आले, त्यांच्याकडून मी हिंदूत्व शिकावं ही त्यांची लायकी तरी आहे का अशी खोचक सवाल करत उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही आमचं हिंदूत्व उघडपणे सांगतो आणि त्याचे पालनही करतो, मग तुमचं हिंदूत्व तुम्ही जनतेसमोर का सांगत नाही असा सवालही करत शंकराचार्यांनी मध्यंतरी सांगितलं की, जो विश्वासघात करतो तो खरा हिंदू असू शकत नाही. त्याप्रमाणेच ज्या पध्दतीने आमचं सरकार विश्वासघाताने पाडलं तुम्ही हिंदू असूच शकत नाही अशी टीकाही यावेळी भाजपावर केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत आपलं चिन्ह लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं अजून पोहचलं नाही. त्यामुळे लोकांनी शिवसेना म्हणून जून्या चिन्हावरच मतदान केल्याचं दिसून येतंय. पण येणाऱ्या विधानसभा निवडणूकीपर्यंत काहीही करून आपलं मशाल चिन्ह हे राज्यातल्या सर्व जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी आपल्या शाखांच्या फलकावरील धनुष्यबाण चिन्ह हटवून तेथे मशाल चिन्ह लावा असे आवाहनही यावेळी केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराजांची वाघनख लंडन वरून आणली असे सांगत सुटले. मात्र ती वाघनख खरीच शिवाजी महाराजांची तरी आहेत का असा सवाल करत नखांच्या मागे जेव्हा वाघ असतो तेव्हा ती खरी असतात असा टोला लगावत इथं माझ्यासमोर बसलेली खरी नख शिवसैनिकांच्या रूपाने बसली आहेत. हीच खरी शिवाजी महाराज यांच्या विचाराचे मावळे असल्याचेही यावेळी सांगितले.

आणीबाणीच्या काळातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची पत्राचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, त्या वेळी बाळासाहेब देवरस यांनी दोनवेळा पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना पत्र लिहिलं, त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलय की राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्य हे फक्त हिंदू समाजाच्या लोकांपर्यंतच सीमित असून मुस्लिम धर्मिय आणि ख्रिश्चन धर्मियांच्या विरोधात कार्य करणे यावर संघात चर्चा होत नाही. देवरस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतानाही आताचे त्यांचे चेले जे केंद्रात बसले आहेत ते काय करतात, कोणाच्या विरोधात गरळ ओकत असतात असा सवाल करत म्हणूनच आता यांना संघाची गरज राहिली नाही असे भाजपाचे अध्यक्ष नड्डा म्हणाले ते उशीच नाही असा टोलाही यावेळी लागवला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *