Breaking News

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ठरावाची मागणी सभापतींकडे करायची, कशाला बोट करून बोलायचे अंबादास दानवे-प्रसाद लाड यांच्यातील शिवीगाळ प्रकरणावरून केले पहिल्यांच भाष्य

संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या निषेधाचा ठराव विधान परिषदेत मांडण्याची मागणी भाजपा सदस्य प्रसाद लाड आणि गटनेते प्रविण दरेकर यांनी केली होती. मात्र प्रसाद लाड यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करून बोलल्याने शिवसेना उबाठा गट आणि भाजपाचे अंबादास दानवे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावरून याप्रश्नी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या शिवीगाळ प्रकरणी आई-बहिणींची माफी मागितली. तसेच लोकसभेत झालेल्या भाषणावर महाराष्ट्राच्या सभागृहात चर्चा कशाला असा सवाल करत त्यांना जर मागणी करायची होती तर त्यांनी सभापतींकडे करायची विरोधी पक्षनेत्यांकडे बोट करून मागणी कशाला करायची असा खोचक सवालही यावेळी केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभेत राहुल गांधी हे चुकीचे काय बोलले. त्यांनी जे लोकसभेत भाषण करताना जे बोलले. ते योग्यच होते. जसे मी नेहमी सांगत आलोय की, भाजपाला सोडले आहे, हिंदूत्व सोडले नाही. तेच तर राहुल गांधी यांनी बोलले. तसेच राहुल गांधी यांनी हिंदूत्वाचा अपमान केला नाही. तरीही अपुऱ्या माहितीच्या आधारे अपमान केला असे भाजपाकडून सांगण्यात आले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. त्यांच्या हिंदूत्वाचा बुरखा फाडल्याचेही यावेळी सांगितले.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जय संविधान म्हणण्यालाही विरोध करणाऱ्यांच्या विरोधात ठराव आणायला पाहिजे आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला हवी अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही नुकत्याच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे गेलो. त्यात शिवसेना उबाठा गटाला जे निर्विवाद यश मिळाले. नाशिक आणि मुंबईतील जागा आमच्याचकडे राखण्यात यश मिळावले आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवारांना निवडूण आणण्यात ज्या ज्या पक्षाने, कार्यकर्त्यांनी मदत केली. त्या सर्व कार्यकर्त्ये पक्षाचे आभार मानत असल्याचेही यावेळी सांगितले.

अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्या शिवीगाळ प्रकरणावरून बोलताना म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी ठरवूनच टाकले होते की, अंबादास दानवे यांना निलंबित करायचे म्हणून त्यानुसार त्यांनी कारवाई केली. त्यावर आता बोलणे योग्य होणार नाही. मात्र जर सत्ताधाऱ्यांना लोकसभेतील राहुल गांधी यांच्या भाषणावर निषेधार्थ ठराव मांडायचा होता, तर त्याची मागणी त्यांनी सभापती यांच्याकडे करायची होती, अंबादास दानवे यांच्याकडे बोटं करून बोलायची गरज काय होती असा सवालही यावेळी केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीकडून तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयंत पाटील हे आमचे आणखी एक उमेदवार आहेत. त्यांना आम्ही तिघे मिळून निवडूण आणणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

अंबादास दानवे म्हणाले, सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक निलंबनाची कारवाई नीलम गोऱ्हे यांनी जाहिर केल्यानंतर व्यक्त केली खंत

सोमवारी विधान परिषद सभागृहात शाब्दिक चकमकीनंतर सभापती यांनी आज केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *