राज्य सरकारच्या तिजोरीवर येणाऱा भार कमी करण्यासाठी आता नव्याने सत्तास्थानी विराजमान झालेल्या महायुती सरकारकडून लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची तपासणी करण्यात येत असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच योजनेत नव्याने अटी व नियम लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्ष्प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरात पत्रकार परिषेद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने बहिणींमध्ये आवडती-ना आवडीती असा भेदभाव करू नये असा टोला यावेळी लगावला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक जिंकण्यासाठी महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहिर करत नाव नोंदविणाऱ्या प्रत्येक महिलेला १५०० रूपये देण्यात आले. याबरोबरच राज्यात सत्तेवर आल्यानंतर १५०० रूपये नाहीतर २१०० रूपये देणार असल्याचे आश्वासनही यावेळी दिले होते. मात्र बहिणींमध्ये आवडती ना आवडती असे न करता घोषणा केल्याप्रमाणे बहिणींना सरसकट २१०० रूपये द्या अशी मागणी यावेळी केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूकीत गरज होती म्हणून बहिणींना पाच पाच महिन्यांचे आगाऊ पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र आता गरज संपल्यानंतर त्या महिलांची छाणणी करण्यात येणार असल्याचे कारण आता पुढे करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या चुकीच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. त्यांच्याकडून ते वसूल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील बहिणींना बाबत आता सरकारकडून आवडती ना आवडती असा प्रकार सुरु केल्याचा टोला लगावत निवडणूकीत घोषणा केल्याप्रमाणे बहिणांना २१०० रूपये द्यावे आणि ही योजना यापुढेही सुरु ठेवावी अशी मागणीही यावेळी केली.
त्यांना आता अनुभव नावाचा गुरू भेटला- उद्धव ठाकरे
महायुतीतील मंत्री पदाची संधी नाकारल्याने अनेक जण नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीतील छगन भुजबळ हे शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असल्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, मी यापूर्वीच सांगितलं होते. पण त्यांना आता अनुभव नावाचा गुरु असतो तो त्यांना आता भेटला आहे. त्यामुळे तिकडचे अनके नाराज आता बोलत आहेत असे सांगत छगन भुजबळ यांच्याशी मी नेहमीच बोलतो, तसेच ते नेहमी माझ्या संपर्कात असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya