वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी दिली.
पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, उजव्या कोरोनरी धमणीमध्ये एक लहान ब्लॉकेज आढळला आहे, जो अँजिओप्लास्टीने सहजपणे काढला जाऊ शकतो. त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. दुपारच्या जेवणात बाळासाहेबांनी भाजी, डाळ, चपाती घेतली आहे. बाळासाहेबांवर उद्या पुण्यात अँजिओप्लास्टी होणार आहे. बाळासाहेबांच्या अँजिओग्राफीचा अहवाल उद्या सकाळी १० वाजता प्रसारमाध्यमांसमोर येणार आहे.
पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहिरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
दरम्यान सुजात आंबेडकर म्हणाले की, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा असे आवाहन करत मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत असल्याचेही यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हॅण्डलवरून कळवण्यात आले आहे.
Marathi e-Batmya