आमदार संजय गायकवाड यांचा वेटरला मारहाण करताचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री म्हणाले… विधिमंडळात व्हिडिओतील आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीचे पडसाद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओत संजय गायकवाड यांच्याकडून आकाशवाणी आमदार निवासातील एका वेटरला मारहाण करतानाचे त्यात दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधिमंडळात उमटले असून त्यावर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली आहे.

यासंदर्भात संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, जर कुणी मला विष चारत असेल तर मी त्याची पूजा करायची का असा सवाल बाळआसाहेब ठाकरे यांनी आम्हाला हे शिकवले नाही. आमच्यावर अन्याय झाल्यास त्या विरोधात पेटून उठण्याची शिकवण त्यांनी दिली.

तसेच याप्रकरणी विधान परिषदेत चर्चा झाली असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून येते.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, आकाशवाणी आमदार निवासतील कँटीन चालकांना वारंवार सांगितले होते की, जेवणाचा दर्जा सुधारावा, मात्र काहीच सुधारणा झाली नाही. मी ३० वर्षापासून आकाशवाणी कँटीनमध्ये येत आहे. ५.५ वर्षापासून येथे रहात आहे. जेवणाचा दर्जा सुधारा असे मी अनेकदा सांगितले. मात्र काहीच सुधारणा झाली नाही. अंडी-मांस १५-२० दिवसापूर्वीचे शिळे, भाज्याही शिळ्याच असतात, इथे पाच ते दहा हजार लोक दररोज जेवतात, सर्वांच्या अशाच तक्रारी आहेत.

या व्हायरल व्हिडिओवरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका केली. तर त्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, उबाठाच्या खासदाराने १० वर्षापूर्वी दिल्लीत काय केले होते. त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यानंतर उबाठाच्या खासदाराने  कँटीन चालकाच्या तोंडात चपाती कोंबली होती. त्यावेळी त्या चालकाचा रोजाही देखील त्यांनी तोडला होता. त्यावेळी संजय राऊत कुठे गेले होते असा सवाल करत मी तर असे काही केले नाही असे सांगत यापूर्वी कँटीनच्या जेवणात पाली, उंदीर आणि दोऱ्या आढळल्या होत्या. आता आमदारालाच अशा प्रकारचे शिळे अन्न मिळत असेल तर विचार करा, सामान्य माणसांना किती निकृष्ट पद्धतीचे जेवण दिले जात असेल असा सवालही केला.

दरम्यान, विधान परिषदेत या घटनेचे पडसाद उमटले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अनिल परब यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. त्यावर सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ पाह्यला अशा प्रकारचे वर्तन विधिमंडळ सदस्यास भूषणावह नाही. यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा कमी होत आहे. आमदार निवासात सोयी-सुविधा नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. पण लोकप्रतिनिधींनी अशावेळी तक्रार करावी पण मारहाण करणे चुकीचे असल्याचे सांगत याप्रकरणी विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी सूचनाही यावेळी केली.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *