विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये त्यासाठी हा कट शिजला सुनेत्रा पवार यांनी तेरावा होण्यापूर्वीच शपथविधीचा कार्यक्रम उरकून घेतला

दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कुठेतरी कट शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली असे मला वाटते, खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धारून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे, कदाचित भाजपाच्या दाबावापुढे असा निर्णय झाला असावा, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर राज्यातील राजकारणाला एक वेगळे वळण आले. राज्यात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचा तेरावा होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी बद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नाही.

अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या घडामोडीवर विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले. विजय वडेट्टीवार यांनी विलगीकरणाबद्दल बोलताना म्हटले की, अजित पवार यांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणे आवश्यक आहे का? हा त्या पक्षाचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाला का सांगितले नाही? किंवा त्यांना सांगितल्या शिवाय पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग भारतीय जनता पक्ष म्हणेल, त्याच पद्धतीने चालतो का? असे अनेक सवाल उपस्थित केले.

विजय वडेट्टीवार यांनी पुढे असेही सांगितले की, एक खर आहे की दोन्ही राष्टवादी पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली, असे मला वाटते, असे सांगत पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असे कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईने का घेतला असे लोकांचं मत आहे, कदाचित भाजपाच्या दाबावापुढे असा निर्णय झाला असावा अशी शंकाही उपस्थित केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, विलनीकरण होऊ नये अशी भूमिका भाजपाची होती आणि त्यातून भाजपाला नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजपाच्या बरोबर वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्या नेत्यांची इच्छा सुद्धा नव्हती. दशक्रिया झाल्याशिवाय कुठलाही पदभार घेऊ शकत नाही. काल भाजपाच्या प्रवक्त्याने सांगितलं की, इंदिरा गांधीजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान पदी राजीव गांधींची निवड झाली. पण काही लोकांना कळत नाही की ते पद संविधानिक आहे आणि पंतप्रधान पद एकही दिवस रिकामा ठेवता येत नाही, असा टोला भाजपाला लगावत उपमुख्यमंत्री पद हे काही संविधानिक पद नाही. त्यामुळे तेराव्याचा कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रम करता आला असता.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. अनेकांनी हा कट असल्याचे म्हटले. या विमान अपघाताची चौकशी केली जात असून ही चौकशी सीआयडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *