विजय वडेट्टीवार यांची मागणी, प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, संभाजी ब्रिगेडचे गायकवाड यांच्यावर अमानुषपणे हल्ला झाला. एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा आहे, त्याने चुलत भावाची हत्या केली म्हणून तुरुंगवास ही भोगला आहे. एका पक्षाचा तो कार्यकर्ता आहे पण ह्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हल्ला होणार यांचे इंटेलिजन्स नव्हते का? या कार्यक्रमात पोलिस बंदोबस्त का नव्हता? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, यांच्यासाठी कायदा नाही का? गायकवाड हे निर्भिडपणे काम करत आणि त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. त्याची दखल घेऊन हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सभागृहाला दिली.. तसेच या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

About Editor

Check Also

डॉ पंकज भोयर यांचा इशारा, शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार अशा शाळांची यादीही तयार करण्याचे प्रशासनाला दिले आदेश

विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांतूनच पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *